मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी रविवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर आणि निपाणी येथील पूरग्रस्त भागांची पहाणी केली आणि पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले.
संकेश्वर भागांत गेल्या आठवडाभरा पासून सुरू असलेल्या पावसाने हिरण्यकेशी नदी पात्रातील अनेक ठिकाणी पूर आला आहे मुख्यमंत्र्यांनी पहाणी करून पूर ग्रस्तांकडून तक्रारी स्वीकारल्या.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाने हिरण्यकेशी वेदगंगा,कृष्णा घटप्रभा मलप्रभा नद्यांना आणि बेळगाव जवळील बळळारी नाल्याला पूर आला असून सगळी धरणे तुडुंब झाली आहेत.
संकेश्वर येथील मठ गल्ली कुंभार भागांची पहाणी करत आश्रय केंद्रांना भेट देत पीडितांच्या समस्या जाणून घेतल्या संकेश्वर येथील पुरग्रस्त पुनर्वसन करण्यासाठी 50 एकर जमिनीची गरज असून कायमस्वरूपी घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले.
पाऊस थांबल्यानंतर पंचनामा करून घरांची नुकसानभरपाई दिली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. संकेश्वर व्यतिरिक्त निपाणी यमगरणी भेट देत राष्ट्रीय महामार्गाची देखील त्यांनी पहाणी केली.यावेळी महसूल मंत्री आर अशोक,मंत्री उमेश कत्ती, मंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री गोविंद कारजोळ आदी उपस्थित होते.
630 कुटुंबाना आश्रय केंद्रात स्थलांतरित केल्याची माहिती जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी दिली.