नऊ वेळा आमदारकी भूषवली आहे मी सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे हे खरं आहे.मंत्री म्हणून सर्व प्रकारचा अनुभव मला आहे मुख्यमंत्री बनण्याची सगळी पात्रता माझ्यात आहे तो योग सुद्धा एक दिवस जुळून येईल.आगामी दिवसांत मी नक्की मुख्यमंत्री होईन असा विश्वास अन्न नागरीपुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.उमेश कत्ती यांनी सर्वात अगोदर उत्तर कर्नाटक या स्वतंत्र राज्याची मागणी केली होती व नवीन राज्याचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास अनेकदा व्यक्त केला होता मुख्यमंत्री होईन असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा केलाय.
माझ्यावर कोणताही काळा डाग नाही मी 9 वेळा आमदारकी भूषवली आहे आता माझे वय 60 असले तरी पुढील 15 वर्षात का होईना एक ना एक दिवस मी मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार असेही त्यांनी नमूद केलं आहे.
उमेश कत्ती हे स्पष्ट वक्ते आहेत अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री होण्याची बाबत विधान केले आहे.सध्या मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या बदलाची चर्चा सुरू असताना कत्ती यांच्या सारख्या वरिष्ठ मंत्र्यांच्या तोंडून मुख्यमंत्री होण्याचे वक्तव्य आल्याने पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.
मी मठाधिपती किंवा संन्याशी नव्हे मी राजकारणी आहे त्यामुळे पी एम होण्यासाठी देखील प्रयत्न का करू नये असेही त्यांनी नमूद केलं.
कॉंग्रेस हा देशात आणि राज्यात संपलेला विषय आहे त्या पक्षाचा कधीही उद्धार होणार नाही.डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री होणार याची स्वप्न पडत आहेत.कुणी स्वगृही परततील या भ्रमात डी के शिवकुमार यांनी राहू नये असा टोला देखील त्यानी यावेळी लगावला.