मार्केट पोलीस स्थानक व्याप्तीतील वीरभद्रनगर भागातील दोन घरात चोरी झाल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बुधवारी रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम लॅपटॉप लंपास केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचवा क्रॉस वीरभद्र नगर येथील रफिक वडगांवकर आणि यांच्या घरात चोरट्यानी प्रवेश करून रोख रक्कम दागिने लंपास केले आहेत. गुरूवारी पहाटे या दोन्ही घरफोडी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रफिक वडगांवकर यांच्या घरातील 25 हजार रोख रक्कम 30 हजार सोन्याचे दागिने चोरले आहेत.वीरभद्र नगर भागांत पावसाच्या पाण्याने पूर आल्याने कुटुंबीय त्याच घरातील पहिल्या मजल्यावर स्थलांतरित झाले होते सकाळी 8 वाजता त्यांनी बघितले असता चोरी झालेलं निदर्शनास आलं आहे मात्र चोरटे चोरी करतेवेळी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
या चोरी सह वडगांवकर यांच्या शेजारी असलेल्या शकीला नेसर्गी यांच्या घरात देखील लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली आहे.
एकाच दिवशी आजूबाजूच्या दोन घरात चोरी झाल्याने लोकांत भीती निर्माण झाली आहे. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सी सी टी व्ही फुटेज घेऊन चोरट्यांचा अधिक तपास केला जात आहे.