पर्यावरण प्रेमीनी बेळगाव शहराला ऑक्सीजन पुरवणाऱ्या वॅक्सिंन डेपो मधील झाडे तोडून विकास कामे राबवणाऱ्या सरकारच्या प्रयत्नांना जनहित याचिके द्वारे स्टे मिळवला आहे.
पर्यावरण प्रेमींनी कोर्टात स्थगिती मिळवली असून उच्च न्यायालयाने जैसे थे ठेवा असा आदेश बजावला आहे.वॅक्सिंन डेपो बचाव समितीच्या 11 जणांनी दाखल केलेल्या याचिकेला स्थगिती मिळाली आहे त्यामुळे पर्यावरण प्रेमींना दिलासा मिळाला आहे
वॅक्सिन डेपो मध्ये विविध औषधी वनस्पती आहेत त्यामुळे याला वेगळे महत्व आहे बेळगाव शहराला इथूनचं ऑक्सिजनचा पुरवठा होतो स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत अनेकदा कल्पना दिली असताना देखील ग्लास हाऊसच्या निमित्ताने अनेक झाडांची कत्तल केली जात आहेत अनेकदा जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली तरी देखील दुर्लक्ष झाल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे.
वरून कारखानीस व राजू टोपन्नावर यांच्यासह 11 जणांनी धारवाड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती डबल ग्रीन बॅच समोर या याचिकेची सुनावणी झाली.
चीफ जस्टीस अभय श्रीनिवास ओक आणि न्यायाधीश सूरज गोविंदराज यांनी स्पेशल पी आय एल ग्रीन बॅच समोर सुनावणी झाली असता न्यायाधीशांनी वॅक्सिंन डेपोचे काम जैसे थे ठेवा असा आदेश बजावला आहे. जनहित याचिका दाखल केलेल्यांच्या बाजूने वकील किरण कुलकर्णी वकील सतीश बिरादार यांनी काम पाहिले