Sunday, November 17, 2024

/

शाळेतील फॅन चोरटा गजाआड

 belgaum

लॉक डाऊनच्या संधीचा फायदा घेऊन सरकारी शाळेतील लावण्यात आलेले फॅन चोरी केलेल्या चोरट्याला पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. अमर संजय हजेरी (वय 22) रा. वरधाप्पा गल्ली खासबाग असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

सरकारी मुला मुलींची शाळा नंबर 3 येथील शाळेत 30 मे रोजी कुणीही नसलेल्या संधीचा फायदा घेऊन या युवकाने शाळेतील पाच फॅन चोरी केली होती. चोरी केलेल्या फॅनची किंमत 25 हजार इतकी होती

पंखे चोरी झाल्याची तक्रार शाळेचे मुख्याध्यापक दयानंद शंकर पाटील यांनी शहापूर पोलीस स्थानकात केली होती.

शहापूर पोलिसांनी नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्रीच्या गस्तीवर अमर नामक युवक संशयास्पद रित्या फिरताना ताब्यात घेतल सखोल चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली दिली.

चोरट्याकडून पाच फॅन जप्त करण्यात आल्या.
शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांचे सहकाऱ्यांनी कारवाई केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.