Friday, December 20, 2024

/

बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा*.. ! -खासदार संजय राऊत

 belgaum

“बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत , तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो .सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे.सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणून बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा आहे.असे प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक या नात्याने खासदार संजय राऊत यांनी काढले.”

पाचहजार मातृभाषा भाषा शब्दकळा मूल जन्म घेताना असते म्हणून मातृभाषा ही महत्वाची आहे म्हणून विज्ञान तंत्रज्ञानात यशस्वी होण्यासाठी मातृभाषेत शिक्षण हवं. भाषा आणि संमेलने ही वैश्विक आहेत.

सीमाभागातील 865 गावात मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे. कर्नाटक महाराष्ट्र राज्यांनी एकत्र येवून समन्वयाने केंद्राने मध्यस्थी करून सीमाप्रश्न निकाली काढला पाहिजे असे प्रतिपादन स्वागताध्यक्ष शरद गोरे यांनी केले .Sanjay raut

संमेलनाच्या सुरुवातीला सीमाभागात साहित्य संमेलन ही मराठी संस्कृतीला ऊर्जा देणारी आहे. संमेलने भाषा संस्कृतीचे संवर्धन , साहित्यिकांना लिहिण्याचे बळ मिळावे , मराठी वाचन संस्कृती रुजावी व नवोदित कवींना संधी मिळावी ही भूमिका सीमा भागातील संमेलनाची आहे.

यासंमेलनाना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी असे प्रास्ताविक मध्ये अखिल भारतीय परिषद चे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यानी सांगितले.

सकाळी ११ वा. संमेलनाला गुगल मीट व्दारे ऑनलाईन संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी उदघाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे , परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर , राष्ट्रीय विश्वस्थ ज्ञानेश्वर पतंगे संयोजक बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण व उद् घाटन सत्राचे सुत्रसंचालन उपाध्यक्ष डी.बी.पाटील यांनी सुत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.