Tuesday, January 28, 2025

/

शिवसेनेने श्रमदानाने केला रस्ता दुरुस्त

 belgaum

शहरातील समर्थनगर मेन रोड या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अत्यंत खराब झालेल्या रस्त्याची बेळगाव शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज सोमवारी श्रमदानाने डागडुजी -दुरुस्ती केली.

शहराला जोडूनच असणाऱ्या समर्थनगर या वसाहतीकडे प्रारंभापासूनच महापालिकेसह प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर वसाहत निर्माण झाल्यापासून आजतागायत येथील रस्त्यांचे साधे डांबरीकरण देखील झालेले नसल्यामुळे त्यांची पार दुर्दशा झाली आहे.

सध्या पावसामुळे या ठिकाणच्या रस्त्यांवरील खाच-खळग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. याची दखल घेऊन बेळगाव शिवसेनेतर्फे आज सोमवारी समर्थनगर येथे श्रमदानाची मोहीम राबविण्यात आली.

 belgaum

या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शिवसेना आरोग्यसेवा विभागाचे प्रमुख दत्ता जाधव, तालुका प्रमुख सचिन गोरले, शहर प्रमुख दिलीप बैलुरकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, तानाजी पावशे, वैजनाथ भोगण, चंद्रकांत कोंडुसकर, निरंजन अष्टेकर, राजू कनेरी आदी शिवसैनिकांनी स्वतः श्रमदानाने दगड -माती टाकून खड्डे बुजवण्यातद्वारे समर्थनगर मेन रोड दुरुस्त केला. यासाठी तीन डंपर माती वापरण्यात आली.Shivsena bgm

दरम्यान, शहर उपनगरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरण केले जात असताना समर्थनगरकडे मात्र या बाबतीत साफ दुर्लक्ष केले जात आहे हे चुकीचे आहे. त्यामुळे येथील सर्व रस्त्यांची वाताहत झाली आहे. परिणामी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणच्या रस्त्यांचे लवकरात लवकर डांबरीकरण अथवा कॉंक्रिटीकरण करावे, अशी मागणी बेळगाव लाइव्हशी बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी व्यक्त केली. अन्यथा शिवसेनेला या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.