Sunday, January 26, 2025

/

निवड प्रक्रिया सुरू : आजमावली आमदारांची मते

 belgaum

कर्नाटकच्या नूतन मुख्यमंत्र्यांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून सर्व आमदारांची मते आजमावून ती नवी दिल्ली येथे हायकमांडकडे धाडण्यात आली असल्याची माहिती कर्नाटकातील भाजपचे प्रभारी अरुण सिंग यांनी दिली आहे.

बेंगलोर येथे भाजप आमदारांची बैठक घेतल्यानंतर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते नूतन मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबत संसदीय समिती आणि भाजप विधिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

तथापी सध्या आमदारांची मते जाणून घेऊन ती हायकमांडकडे पाठवण्यात आली आहेत, असे अरुण सिंग यांनी सांगितले. एकंदर पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य झाल्यास येत्या गुरुवार नाहीतर शुक्रवारी राज्याच्या नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.