खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मे महिन्यात खानापूर रामनगर रस्ता जो गेली दोन वर्ष केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे रखडल्याने प्रत्यक्ष पाहणी करून छायाचित्रे व चित्रीकरणा सहित केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठवून लक्ष वेधून घेतले होते,त्यानंतर तालुक्यातील राष्ट्रीय पक्षांनी देखील रस्त्याच्या दिरंगाई बाबत आवाज उठवला होता.याच पाश्वभूमीवर खानापूर युवा समितीने माध्यमाना एक पत्रक प्रसिद्ध केले आहे त्यातील सारांश असा आहे.
राष्ट्रीय पक्ष केवळ श्रेय घेण्यासाठी हे करत आहेत असा आरोप खानापूर युवा समितीने केला आहे.स्थानिक भारतीय जनता पक्षाने या रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी खासदार अनंत कुमार हेगडे यांनी मंजूर करून घेतल्याचे सांगितले त्यावर कळस म्हणून की काय अन्य लोकप्रतिनिधीनी तो निधी कसा 10 कोटी नाही व तालुक्याला कसं फसविल जातंय हे सांगण्याकरिता रस्ता रोको आंदोलनाचं केलं,पण हे करत असताना लोक जमविण्यासाठी व श्रेयवादासाठी आंदोलनाची जागा ऐनवेळी रुमेवाडी क्रॉस निवडली,लोकप्रतिनिधी तालुक्यातील इतर समस्ये वरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आशा आंदोलनाचा सहारा घेत आहेत वरील दोन्ही पक्षाचे कर्तुत्व आहे तालुका जनतेला पूर्ण फसविण्यासाठी चाललेले असून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने यांचा आम्ही निषेध करतो असेही खानापूर युवा समितीने स्पष्ट केलं आहे.
दोन राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष ज्यांना 28 किलोमीटर रत्यासाठी एकाला जो सत्तेवर आहे त्याला तीन वर्षे खोट्या चा आधार घ्यावा लागतो व दुसऱ्या पक्षाला जो तालुक्यात सत्तेत आहे त्यांना आंदोलन करावे लागते हे तालुक्यातील जनतेचे दुर्दैव आहे,यापूर्वी तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार होते तेही विरोधी पक्षात राहून कामे करत होते, तरी सुद्धा तालुक्याच्या विकासात कधीही खंड पडू दिला नाही सरकार दरबारी प्रयत्न करून निधीचा कमतरता कुठेही कमी पडू दिली नाही, हे या ठिकाणी मी नमूद करतो, विकासाचे गाजर दाखवून दोन्ही पक्ष सत्तेत आहेत यांना मी सांगू इच्छितो की अपवाद वगळता तुम्ही तालुक्यात ज्या रस्त्याचा व पुलाचा आधार घेऊन तालुक्यात फिरताय तो रस्ता समितीच्या आमदारांच्या प्रयत्नातून झालेला आहे हे विसरू नका .
या दोन्ही पक्षांना तालुक्यातील जनतेचे कोणतच सोयरसुतक नसून युवा समितीने तालुक्यातील रामनगर रस्ता तसेच इतर अनेक प्रलंबित प्रश्नांना निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे वाचा फोडून तालुक्यातील समस्या ऐरणीवर आणन्याचे काम केले आहे,जोपर्यंत रामनगर रस्त्याचे आम्ही निवेदन दिले नव्हते तोपर्यंत या रस्त्याचे सोयरसुतक कोणालाच नव्हते यापुढेही तालुक्यातील समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाप्रश्नाच्या चळवळी बरोबरच असे अनेक प्रश्न उचलून आंदोलन करेल असंही युवा समितीने म्हटलं आहे.
यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील,कार्याध्यक्ष किरण पाटील, मध्यवर्तीचे सदस्य रणजीत पाटील,विनायक सावंत,मारुती गुरव,राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, राजू कुंभार,बाळकृष्ण पाटील रामचंद्र गावकर विशाल बुवाजी, किशोर कुरिया पत्रकार परिषदेत हजर होते.