लोकमान्य गणेश महामंडळाने गणेश उत्सवासाठी कोविड मार्गदर्शक सूची सरकारने लवकर जाहीर करावी अशी मागणी केल्या नंतर मध्यवर्ती गणेश महा मंडळाने गणेश उत्सवासाठी कोविडचे निर्बंध शिथिल करा असं म्हटलं होतं त्यानंतर आता शहापूर गणेश महामंडळाने पारंपरिक गणेश उत्सवाला परवानगी द्या अशी मागणी केली आहे.
आगामी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी शहापूर मध्यवर्ती श्री गणेशोत्सव महामंडळाने प्रशासनाकडे केली आहे. सदर मागणीचे निवेदन महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव अधिक होता. यामुळे मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला होता. यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून आता उत्सव साजरा करण्यासाठी नियम पालन करून पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची मुभा प्रशासनाने द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, कार्याध्यक्ष रमेश सोनटक्की, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सेक्रेटरी राजू सुतार, खजिनदार मंगेश नागोजीचे, माजी नगरसेवक राजू बिर्जे ,श्रीकांत कदम, राजाराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते.