हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामाची आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या कामासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अहवाल तयार करावयाचा आहे. यासाठी सदर बायपास रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
त्या अनुषंगाने आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी बायपास रस्त्याचे काम कुठवर आले आहे? काम व्यवस्थित झाले आहे की नाही? शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन विरोध केल्यामुळे काम कोठे बंद पडले आहे? वगैरे बाबींची ड्रोन यंत्रणेच्या सहाय्याने माहिती नोंदवून घेतली. तसेच हालगा -मच्छे बायपासचे कंत्राट घेतलेल्या उपस्थित कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचना केल्या.
सदर हवाई पाहणीसाठी सुप्रसिद्ध व्यावसायिक छायाचित्रकार डी. बी. पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आपल्याकडील ड्रोन यंत्रणा उपलब्ध करून दिली होती.