मागील पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. सुरुवातीच्या काळात चार दिवस सतत पाऊस कोसळल्याने नदी नाले प्रवाहित झाले होते. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकरी समस्या अडकले आहेत. काही शेतकरी तर दुबार पेरणी करत आहेत जर अशीच परिस्थिती राहिली तर पुन्हा एकदा समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बळ्ळारी नाला परिसरात असणाऱ्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुवातीच्या काळात जो पाऊस पडला त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले होते. शेतात पाणी शिरून भात पीक कुजले होते. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट उद्भवले.
मागील पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे कामे लागले आहेत. याचबरोबर बटाटा पीक रताळी आधी पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. बटाटा पिकाची उगवण बऱ्यापैकी झाली असली तरी सध्या पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे पाऊस कधी एकदा येतो याकडे शेतकऱ्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.
बेळगाव शहर आणि परिसरात देखील लागून असलेल्या उपनगरांमध्ये शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र तेथेही पाऊस नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. जर येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडला नाही तर मोठी समस्या निर्माण होणार यात शंका नाही. त्यामुळे आता कधी एकदा पाऊस येतो याकडे शेतकरी आज होऊन बसले आहेत.