Friday, December 20, 2024

/

10 लाखाहून अधिक व्यक्तींचे निरीक्षण पूर्ण : नव्याने 94 रुग्ण

 belgaum

गेल्या चोवीस तासात बेळगाव जिल्ह्यात नव्याने 94 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे आज गुरुवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 77 हजार 315 इतकी झाली आहे. याबरोबरच आजपर्यंत जिल्ह्यातील 10,09,910 व्यक्तींचे कोरोना वैद्यकीय निरीक्षण पूर्ण झाले आहे. तसेच आज आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 837 झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 94 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे आज गुरुवारी जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 77,315 इतकी झाली आहे. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज गुरुवारी दि. 15 जुलै 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगांव जिल्ह्यात एकूण 10,09,910 व्यक्तींचे कोरोना वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले.

जिल्ह्यात 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 51,013 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 1,603 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 54,889 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 9,02,414 आहे.

कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 10,08,826 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 77,315 नमुन्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून यामध्ये आज गुरुवारी नव्याने आढळलेल्या 94 जणांच्या अहवालांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत धाडलेल्या नमुन्यांपैकी 9,24,272 नमुने निगेटिव्ह असून जिल्ह्यात सक्रिय रुग्ण (ॲक्टिव्ह केसीस) 1,603 आहेत. त्याचप्रमाणे 2,926 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या एकुण 837 झाली आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून 74875 रुग्ण मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आज गुरुवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये चिक्कोडी तालुक्यातील 30, बेळगाव 10, गोकाक 10, रायबाग 7, अथणी 5, खानापूर 4, सौंदत्ती 4, बैलहोंगल, हुक्केरी, रामदुर्ग आणि इतर प्रत्येकी एक अशा एकूण 94 रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.