सीमा भागातून आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी कंग्राळी खुर्द येथील पायी दिंडी मध्ये सहभागी होणाऱ्या, बेळगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी केली आहे
वर्षानुवर्षे अखंडितपणे पंढरीची वारी वारकऱ्यांचा अमाप उत्साह, लाखो भक्तांच्या तोंडून निघणाऱ्या विठू माऊलीच्या गजरात निघत असते मागील वर्षी व ह्या वर्षी सुद्धा कोरोना भीती दाखवून प्रशासन वारी साठी आडकाठी करत आहे प्रशासनाच्या या आडकाठी धोरणाच्या, समस्त वारकरी निषेध करत आहे, व वारी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करत आहे.
संपूर्ण राज्यामध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू आहे, दारू विक्रीच्या दुकानांना मुक्तपणे परवानगी देण्यात आली, गुटख्याची बिधास्त विक्री चालू आहे, मग मंदिरच बंद कां ठेवण्यात आले आहे असा स्पष्ट सवाल सरकारला करण्यात आलेला आहे.
तरी लवकरात लवकर संपूर्ण मंदिर भाविक भक्तांना खुली करण्यात यावी, व आषाढी वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारला, सीमाभागातील भावीक भक्ताकडून करण्यात आलेली आहे.कंग्राळी खुर्द येथील पायी दिंडीचे संस्थापक निंगोजी पाटील यांच्यासह समस्त वारकरी बंधूंनी वारीला परवानगी देण्याची मागणी केली आहे.