कर्नाटक राज्यात लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना अंडी देण्यात येतात.अंडी पुरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या व्यक्तीकडून निपाणीच्या आमदार आणि राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले या दर महिना एक कोटी रुपये घेत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.
निपाणी येथील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी निपाणीत मोठा मोर्चा काढत काही काळ मानवी साखळी करत आंदोलन छेडले आणि रस्ता रोको करत निदर्शन केली.या आंदोलनात अंड्याची ट्रे घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग दर्शवला होता.
निपाणीला कलंक लावणाऱ्या शशिकला जोल्ले यांचा निषेध असो अश्या घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी जोल्ले यांनी निपाणीच्या नावाला धब्बा लावला आहे त्यांचा राजीनामा सरकारने घ्यावा अशी मागणी केली तर माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी देखील जोल्ले यांचा निषेध करत दरमहा अंडी पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून एक कोटीची लाच घेणाऱ्या महिला बाल कल्याण मंत्री जोल्ले यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी केली.
दरम्यान बेळगावात आर टी आय कार्यकर्ते भिमाप्पा गडाद यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस स्थानकात शशिकला जोल्ले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
बंगळुरूत देखील जोल्ले यांच्या शासकीय निवासस्थाना समोर एन एस यु आय कार्यकर्त्यांनी निदर्शन केली होती.या प्रकरणी मंत्री जोल्ले यांनी जोल्ले यांनी एक कोटी लाच बाबत बोलताना हे आपल्या विरुद्ध रचण्यात आलेलं षड्यंत्र आहे असं म्हटलं आहे.