संपूर्ण लसीकरण झाले असले तरी कर्नाटकाहुन गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोलेम,म आणि बांदा तपासणी केली जात आहे.चे।क पोस्टवरील अधिकारी गोव्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाश्यांना रॅपिड अँटीजेन (कोविड निगेटिव्ह) टेस्ट सर्टिफिकेट तपासून बंधनकारक केले जात आहे. आर टी पी सी आर सर्टिफिकेट काढल्यावर 72 तासांत परतणे बंधनकारक आहे.
सकाळी सात वाजे पर्यंत गोव्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे संपूर्ण लसीकरण केलेल्याना गोव्यात प्रवेश करण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची गरज नाही असा आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला आहे.
ज्यांनी कुणी दोन डोस घेतलेले आणि कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट असेल त्यांना गोव्यात प्रवेश करण्याची परवानगी आहे असाही आदेश सावंत यांनी म्हटलं आहे. मात्र याबाबत कोणताही अधिकृत आदेश बजावण्यात आला नाही.12 जुलै पर्यंत लॉकडाऊनच्या आदेशा बाबत देखील कोणताही उल्लेख केला नाही.
उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या आदेशात 72 तासांच्या पूर्वी काढलेला निगेटिव्ह रिपोर्ट आंतरराज्य प्रवास करणाऱ्याना बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.
नुकताच गोव्याला जाऊन आलेल्या सतीश यांच्या अनुसार त्यांना केरी चेक पोस्टवर निगेटिव्ह प्रमाण पत्राची तपासणी कऱण्यात आली 270 रुपये घेऊन तपासणी करण्यात आली मग निगेटिव्ह येताच गोव्यात प्रवेश देण्यात आला. गोव्यात जाणाऱ्या बसमधील प्रत्येक प्रवाश्याची देखील तपासणी करण्यात येत आहे.
बेळगाव मध्ये प्रवेश करणाऱ्या सावंतवाडीआणि तिलारी मार्गे असलेल्या बांदा येथे, चोर्ला मार्गे असलेल्या केरी येथे तर अनमोड रामनगर मार्गे असलेल्या मोलेंम येथे तपासणी केली जात आहे.
1