ग्रामपंचायतीने वेळीच उपाययोजना करून कंग्राळी खुर्द स्मशान रोड येथील घरांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार थांबवल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
मुसळधार पावसामुळे आज कंग्राळी खुर्द स्मशान रोड येथील लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत होते. त्यामुळे तेथील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
मात्र या प्रकाराची माहिती मिळताच ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती सुधीर पाटील, ग्रा. पं. सदस्य कमला हरीश पाटील, कल्लाप्पा नागोजी, पाटील, प्रशांत पाटील, विनायक कम्मार, रमेश कांबळे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
तसेच विशाल शिवाजी पाटील यांच्या घरामध्ये शिरलेल्या पाण्याची पाहणी केल्यानंतर तात्काळ जेसीबी मागवून चर खोदण्याद्वारे घरांमध्ये शिरणार्या पाण्यासाठी वाट करून देण्यात आली. सदर कार्यवाहीमुळे घरात पाणी शिरण्याचा प्रकार बंद झाल्याने कंग्राळी खुर्द स्मशान रोड येथील रहिवासी ग्रामपंचायतीला धन्यवाद देत आहेत.