बेळगाव राकस्कोप व हिडकल या दोन्ही जलाशयांतून पाणीपुरवठा बंद झाल्याने बेळगाव शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे .
शुक्रवारी हिंडलगा उपसा केंद्रात मार्कंडेय नदीचे पाणी घुसल्याने येथील पाणी उपसा टप्प झाला होता काल रात्री उशिरा हिडकल जलाश यातील उपसा केंद्रातही पाणी घुसल्याने दोन्ही ठिकाणचा उपसा बंद झाल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा झाला आहे.
दोन्ही उपसा केंद्रातील पाणी ओसरल्यावर तेथील वीज पंप पुन्हा सुरू केले जातील. ते पंप पाण्यात बुडाल्याने नादुरुस्त झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी लागेल ते दुरुस्त झाल्यावरच पाण्याचा उपसा शक्य आहे .तोपर्यंत बेळगाव करांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल.
2019 साली आलेल्या पुरा नंतर देखील पंधरा दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला होता त्यानंतर गेल्या आठवडाभर झालेल्या पावसानंतर हिंडलगा पम्प स्टेशन मधून उपसा बंद झाले आहे.
पाऊस कमी झाल्यास आगामी चार दिवसात पंप बसून उपसा सुरू होईल त्या नंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल अशी शक्यता पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.