अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव यांच्याकडून २५ जुलै २१ रोजी बेळगाव सीमाभागातील पहिलेच ऑनलाईन संमेलन होणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत दिली.
दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी (ऑनलाईन)साहित्य संमेलन ऑनलाइन पध्दतीने सकाळी 11.00 वा. गुगलमीटव्दारे दोन सत्रात घेण्यात येणार आहे
यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्यिक श्रीराम पचिंद्रे तर स्वागताध्यक्ष अभामसाप राष्ट्रीय अध्यक्ष व साहित्यिक शरदजी गोरे भूषवणार आहेत तर निमंत्रक सीमाकवी रवींद्र पाटील आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी शिवसंत संजयजी मोरे,अँड.सुधीर चव्हाण,डी.बी.पाटील,अरूणा गोजे-पाटील,रणजित चौगुले यांच्यासह आदी मान्यवर सहभागी होणार आहेत
कोविड काळात लॉक डाऊन मध्ये सर्वत्र शाळा असोत किंवा अनेक क्षेत्रात ऑनलाइन गुगल मिट वर आयोजन केले जात आहे त्यात बेळगावात देखील हे मराठी साहित्य संमेलन ऑनलाइन आयोजित केले जात आहे.
Hii.me hi kavita lihite….mlahi aavdal ast online kavi sanmelnamdhe sahbha ghyayla