Monday, December 30, 2024

/

शेतकऱ्यांच्या श्रमदानातून कालवा स्वच्छ

 belgaum

गांधीनगर किल्ला खंदका पासून ते बळळारी नालापर्यंत जोडणाऱ्या कालव्यातून गवत व झाडे झुडपे,वाढल्याने शिवारात पाणी जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत,तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर यांनी पाठपुरावा केला होता.

शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे हा नाला स्वच्छ करण्याची गरज लक्षात घेऊन नारायण सावंत सुनील जाधव, सुनील खनुकर यांनी लोकसहभागाची हाक दिली. पहिल्या टप्प्यातच त्यांच्या हाकेला शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच शेतकऱ्यांना आपल्या शिवारात काम असल्याने उर्वरित नाला मंजूर लावूनच हा नाला स्वच्छ करण्यात आला.

या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभाग घेत तसेच सुमारे 60 ते 70 टन झाडे झुडपे, काढली

गांधीनगरातून वाहणारा नाला स्वच्छता मोहिमेत विविध अंतरावर पाच टप्प्यात करण्यात आला या पाचही ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच शेतकरी आणि मंजुर नाला स्वच्छता मोहिमेस सहभाग घेतला होता.

या कालव्याच्या पूर्वेकडील बाजूने सफाईला सुरुवात करण्यात आली बेळगाव शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले सध्या पावसाळा असल्यामुळे मजूर लावूनच हे काम केले जात आहे. या कालव्यामध्ये झाडे झुडपे,गवत वाढल्याने तसेच शिवारात पीक असल्याने त्या कालव्यामध्ये जेसिबी किंवा हिटाची उतरणे अवघड झाले आहे या खंदकाचे पाणी बळळारी नाल्याला जात आहे मात्र कालवा बुजून गेल्यामुळे शिवारातील आजूबाजूच्या शेतात पाणी जाऊन शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

तसेच नाल्यामध्ये जिथपर्यंत जाणे शक्य होते, तिथपर्यंत कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून सफाई केली. नाल्यामधील प्लस्टिक, काचेच्या बाटल्या, पिशव्या, झाडांच्या फांद्या बाहेर काढल्या गेल्या. त्याचबरोबर नाल्याच्या दोन्ही बाजूस जमा झालेला कचरा उठाव करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.