लोंढा ते गोवा मार्गावरील दूधसागर दरम्यान दरड कोसळून या मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारी बंद करण्यात आली होती.दरम्यान रेल्वेने या ठिकाणची दरड हटवली आहे.हा मार्ग रेल्वे धावण्यासाठी मोकळा करण्यात आला आहे.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता करंजवण-दूधसागर मार्गावर दरड कोसळली होती. या मार्गावर धावणाऱ्या मंगळूर- मुंबई रेल्वेचा डबा घसरला होता.
काल शनिवारी दिवसभर तसेच शुक्रवारी रात्री दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले होते. हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
दरड कोसळल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्य. दरड कोसळले ला मार्ग मोकळा करण्यात आला आहे. लवकरच नियोजनानुसार या मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती रेल्वे वतीने देण्यात आली आहे.