बेळगाव तालुक्यात येणाऱ्या नंदिहळळी गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाला आहे. गावातील गटारी ड्रेनेज पाण्यामुळे तुंबून रस्त्यावर पाणी येत आहे तर गावच्या बाहेर हीच समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी होत आहे.
काही वर्षांपूर्वी नंदिहळळी येथे डेंगूची मोठी साथ निर्माण झाली होती. याला कारण ही अस्वच्छताच असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटील गल्ली लोंढे गल्ली परिसरात गटारी तुंबून भरुन असतात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात उद्भवतो.
ही समस्या रोजचेच आहे. त्यामुळे आजारही वाढत आहेत. येथील गटारी निर्माण करण्यात आल्या तरी पाणी निचरा होत नसल्याने अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सध्या कोरोना भयावह परिस्थिती असतानाच गावाला मात्र अस्वच्छतेचा विळखा निर्माण झाला आहे. परिणामी ही समस्या मागील अनेक वर्षांपासून आहे. मात्र तातडीने सोडविण्याकडे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर ही समस्या भयावह परिस्थिती निर्माण करणारे ठरेल यात शंका नाही.
त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन येथील गैरसोय दूर कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. बेळगाव शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव निसर्गसंपन्न आहे. मात्र गावात अस्वच्छता निर्माण झाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे.
नंदिहळळी गावातील अनेकांना कोरोना ची लागण झाली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे या गावात वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नाहीत. आशा कार्यकर्त्यांवर आरोग्याचा डोलारा सुरू आहे. अशी परिस्थिती असताना येथील अस्वच्छता अनेकांना डोकेदुखी ठरू लागली आहे. येथील गटारी स्वच्छ करून येणाऱ्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी होत आहे.