बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील केंबळी नाल्यामध्ये एक इसम वाहून गेल्याने बेपत्ता झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती सोमवारी सकाळी साडे दहा वाजता त्याचा मृतदेह मिळाला आहे.
एस डी आर एफ आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर मृतदेह शोधून काढला आहे.
नाल्यात वाहून गेलेल्या इसमाचे नाव यल्लाप्पा देसुरकर (वय 48) असे असून त्याला पोहता येत नसल्याने तो केम्बळी नाल्यात वाहून गेला होता.
रविवारी सायंकाळी नाल्याच्या काठावर यल्लाप्पाचे कपडे आढळून आले होते घटनास्थळी रविवारी अग्निशामक दलाचे जवान गेले होते मात्र अंधार झाल्यामुळे काल शोध कार्य हाती घेता आले नव्हते ते आज सोमवारी सकाळी हाती घेण्यात आले.
बेनकनहळ्ळी गावाशेजारील केंबळी नाल्यानजीक ब्रह्मलिंग तलाव आहे. या तलावात संबंधित इसम हातपाय धुण्यासाठी गेला होता. त्यावेळी तोल जाऊन पडल्याने तो तलावातून नाल्यात वाहून गेल्याचे सांगण्यात आले. सदर घटनेची बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.