मुलांना शाळेत दाखला द्या असे सांगून शाळेच्या बॅंक खात्याची माहिती घेत शाळेच्या बँक खात्यावरील 90 हजार रुपये ऑनलाइन गंडवल्याचा प्रकार बेळगावातील एका पब्लिक स्कुल मध्ये उघडकीस आला आहे
ऑनलाइन सायबर गुन्हेगाराने शाळेच्या अकाउंट वरील पैसे आपल्या अकाऊंटवर ट्रान्सफर करून घेत शाळेला फसवले आहे.
केवळ सोशल मीडिया माध्यमातून नव्हे तर शाळेत ऍडमिशन हवं आहे असा बनाव करत देखील बँक खात्याची माहिती घेत चक्क शाळेला ऑनलाइन टोपी घालण्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव सायबर पोलीस स्थानकात दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत .सदर सायबर गुन्हेगाराने आपण सैन्यात जम्मू काश्मीर मध्ये सेवा बजावत आहे माझी बायको मुले बेळगावात राहतात मुलांना शाळेत एल के जी ला ऍडमिशन द्या अशी मागणी व्हाट्स अप द्वारा नकली फोटो पत्ता पाठवत केली.
सैन्यात असल्याने ऑनलाईन फी भरतो असे सांगत अकाऊंट डिटेल मागवून घेतले शाळेच्या खात्यावर एक रुपये पाठवला व शाळेच्या खात्यातील 90 हजार रुपये ऑनलाइन फसवून आपल्या खात्यात घेतले.
ऑनलाइन फसवणुकीत शाळांना देखील लक्ष केलं जातं आहे त्यामुळे शहरातील शाळा प्रशासनाने देखील सतर्क रहावे असे आवाहन डी सी पी विक्रम आमटे यांनी केलं आहे.