Saturday, January 4, 2025

/

‘त्या’ अपहरणकर्त्यांना शोधून कडक शिक्षा करा : क्रेडाई

 belgaum

बेेेळगाव शहरातील उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना त्वरित गजाआड करून कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी क्रेडाई बेळगाव या संघटनेने केली आहे.

क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि पोलिस उपायुक्तांना सादर करण्यात आले.

कणबर्गी रोड माळमारुती येथे निवासस्थानाजवळून आमचे सदस्य मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण शनिवारी करण्यात आले. या घटनेमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. अपहरणकर्त्यांनी मदनकुमार यांना भयानक परिणामांची धमकी देऊन त्यांचे अपहरण केले.Credai

मारहाणकरून त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या. हा प्रकार भविष्यात अन्य उद्योजकांच्या बाबतीत घडू नये यासाठी संबंधित अपहरणकर्त्यांना शोधून काढून कडक शिक्षा करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी क्रेडाईचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्यासह राजेंद्र मुतगेकर,युवराज हुलजी,विजय भंडारी,विजय पाटील,प्रशांत वाडकर,अमर अकनोजी, भगवान वाळवेकर,आनंद तुडियेकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.