Friday, January 24, 2025

/

खानापूर आणि बेळगाव ग्रामीण मधली यांची मदत कौतुकास्पद

 belgaum

बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात कोविड काळात मदत पोचवत नियती फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ सोनाली सरनोबत या देखील डॉक्टर कोरोना वारीयर ठरल्या आहेत.

सरनोबत यांनी कोरोना काळात 10000 N95 मास्क, अगणित सॅनीटायजर, 1000पिपिई किट, आक्सीमीटर, 5000 ग्रोसरी किट यांचे वितरण केले आहे. प्राणीसेवा, गोसेवा ,अन्नधान्य, कोविडची औषधे, हॅास्पिटल बेड मिळवून देणे , गरजूंना अशा सर्व तर्हेने समाजाची मदत केली आहे. एकही दिवस दवाखाना बंद न ठेवता रूग्णसेवाही केली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायजर चा वापर या गोष्टी विसरून चालणार नाहीतच.कोरोनाला हद्दपार करण्यासाठी 100% वॅक्सीनेशन होणे गरजेचे आहे यावर जनजागृती करत
डॅा  सरनोबत यांनी कोरोना काळात कोरोना होऊ नये म्हणुन आजवर लाखो रूग्णांना ईम्युनोबुस्टर औषधांचे भाजप महिला पदाधिकारी व खानापुर प्रभारी या नात्याने मोफत वाटप खानापुर व बेळगांव ग्रामीण येथे केले आहे.

Niyanti
आता कोरोनाची तिसरी लाट येऊ नये व आल्यास लहान मुलांना त्याचा त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी त्यांनी आपल्या नियती फाऊंडेशन तर्फे पुन्हा सर्व गांवांतून या प्रतिकारशक्तीवर्धक औषधांचे वाटप आपल्या कार्यकर्त्यांद्वारे सुरू केले आहे.

सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षिका , पालक वर्ग, आशा कार्यकर्त्या यांचे सहकार्य लाभत आहे. चिखले, बेटणे, तळवडे, हब्बनहट्टी, जांबोटी, कलमणी, कलमणी, आमटे, कणकुंबी, देवीची हट्टी, आमगांव, कुसमळी , चापोली, कापोली, गोल्याळी, आमगाव, देगांव,तोराळी,गवळीवाडा, मुडगई, उच्चवडे,वडगांव अशा अनेक गांवातुन ही औषधं या कोरोना काळात पोचती केली आहेत. अर्जुन गावडा, आनंद पाटील, पुजा कांबळे यांनी व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी परीश्रम घेतले.
जवळजवळ विस हजार मुलांपर्यंत ही औषधं पोहोचली आहेत.Dr sonali sarnobat

तिसरी लाट कशी असेल:

व्हायरोलॅाजीस्ट असे म्हणतात की तिसरी लाट ही खुप सौम्य असेल कारण लहान मुलांच्या मधे सायटोकायनीन स्टॅार्म होऊन रिॲक्शन होण्याचे प्रमाण कमी असते.त्यामुळे फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात.

तिसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त गंभीर पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे. तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे असे डॉ सोनाली सरनोबत यांनी सांगितले.niyati foundation logo

तज्ज्ञांच्या मते, किती लोकांचं लसीकरण होईल. त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे अवलंबून असेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यू कमी होण्यास मदत होईल.साथरोग तज्ज्ञांनी तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. ऑक्सिजनच्या बाबतीत आपण परिपूर्ण असलं पाहिजे.केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशभरात पाच म्युटंट आढळून आले आहेत. त्यात एक डबल म्युटंटही आहे. तज्ज्ञांच्या मते, हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा असल्याने याचा प्रसार तीव्र वेगाने होत आहे. याची संसर्ग क्षमताही खूप जास्त आहे असेही त्या म्हणाल्या.

तरीही मुले आपले भविष्य असल्यामुळे लस येईपर्यंत होमिओपॅथीची मदत घेणे नक्कीच स्वागतार्ह आहे. होमिओपॅथिक ईम्युनोबुस्टर साठी +91 72592 91554 या नंबर वर संपर्क करावाअसे सरनोबत यांनी कळवले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.