केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील चौघांना स्थान मिळालं असलं तरी राज्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही हे निष्फळ ठरेल असे मत के पी सी सी कार्याध्यक्ष आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
इंधन दरवाडी विरोधात बेळगाव काँग्रेसच्या वतीनं सायकल मारत निदर्शन करण्यात आली.काँग्रेस कार्यालय ते चन्नम्मा चौका पर्यंत सायकल मारत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले त्यावेळी काँग्रेस भवनात माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केलं आहे.
केंद्रातल्या मोदी सरकारचा विकास दर 50 टक्के होता या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आणखी सावकाश होणार असून 30 टक्क्यावर येईल ज्या प्रमाणे मिरज पंढरपूर लोकल रेल्वे सावकाश जात होती तश्या धिम्या गतीवर आहे असाही टोला त्यांनी लगावला.
गाडीचे इंजिन खराब झाले आहे त्यामुळे गाडी बदलून काय उपयोग असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदीचं अपयशी झाले आहेत त्यामुळे राज्याला चार मंत्री देऊनही काहीही उपयोग होणार नाही असेही त्यांनी नमुद केलं.
दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणि इंधन दरवाडी विरोधात राज्यभर काँग्रेस आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाची सुरुवात सतीश जारकीहोळी यांनी बेळगावातून केली. यावेळी अन्य काँग्रेस नेत्यांनी सहभाग दर्शवला होता.