बेळगाव जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे येत्या रविवारी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे आपल्या बेळगाव दौऱ्यादरम्यान पूर परिस्थितीची हवाई पाहणी करण्याची शक्यता आहे. कृष्णा काठावरील पूर परिस्थितीसह अन्य ठिकाणी पुराची पाहणी करून ते आढावा घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.सकाळी साडे दहा वाजता ते बेळगाव विमानतळावर दाखल होणार असून दुपार पर्यन्त पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्यासह पुनर्वसन केंद्रांना भेटीदेणार आहेत तर अडीच वाजता जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री अधिकारी यांच्यासोबत पूरग्रस्त आढावा बैठक घेणार आहेत त्या नंतर सायंकाळी 4 वाजता विमानाने बंगळुरू कडे रवाना होणार आहेत.
येडियुरप्पा हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तसेच 26 जुलैला ते राजीनामा देणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यानात्याने बी. एस. येडियुरप्पा यांचा हा शेवटचा बेळगाव दौरा असणार की काय? अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.