महाराष्ट्रातील विशेषता चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत पोहोचावी, या उद्देशाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या मदत केंद्रात जमा झालेले दोन ट्रक जीवनावश्यक व गृहपयोगी साहित्य आज शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता चिपळूनला रवाना झाले असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी बेळगाव लाईव्हला दिली.
महाराष्ट्रातील विशेष करून चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत पोहोचावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवप्रतिष्ठानच्या मदत केंद्राला बेळगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मागील चार दिवसांमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांनी दिलेला निधी तसेच जीवनावश्यक साहित्य आणि गृहोपयोगी साहित्य शिवप्रतिष्ठानच्या मदत केंद्रात जमा झाली आहे.
हे साहित्य भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाने चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. अन्नपूर्णेश्वरी भक्त मंडळ, शिवप्रतिष्ठान सावगाव विभाग, हंगरगा विभाग, कणबर्गी विभाग, नावगे विभाग, रामघाट मार्ग बेनकानहळ्ळी, शिवप्रतिष्ठान केदारवाडी विभाग, वडगाव विभाग, शहापूर विभाग आणि शहर विभागाच्यावतीने 200 ब्लॅंकेट, प्रसाद मेडिकल्स, अन्नपूर्णा हॉटेल उद्यमबाग, यशस्वी महिला मंडळ पद्मश्री बिळगी फौंडेशन, मार्केट यार्ड व भाजी मार्केट व्यापारी यांनी शिवप्रतिष्ठानच्या मदत कार्यासाठी भरभरून सहकार्य केले आहे. याखेरीज बेळगाव शहर व परिसरातून नागरिकांनी शक्य तेवढी मदत केली असल्याचे सांगून किरण गावडे यांनी समस्त नागरिकांचे आभार मानले आहेत.
शिवप्रतिष्ठानच्या मदत केंद्रात जमा झालेले जीवनावश्यक आणि गृहोपयोगी साहित्य घेऊन आज शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता दोन ट्रक चिपळूणला रवाना झाले.
तेथे पूरग्रस्तांना ही मदत घरोघरी जाऊन पोहोचविली जाणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे यांनी दिली.