बेळगाव कँटोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील न्यू पोल्ट्री मार्केट, व्हेजिटेबल मार्केट आणि फिश मार्केटमधील गाळ्यांसाठी निविदा काढली आहे. येत्या 6 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया होणार आहे.
सदर लिलावात भाग घेणाऱ्यांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असावीत. कॅन्टोन्मेंटच्या थकबाकीदारांना या लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.
हे गाळे 31 मार्च 2023 पर्यंत लीजवर देण्यात येणार आहेत. यासाठी ईएमडी रक्कम 1 हजार रुपये आहे, तर सुरक्षेसाठी आगाऊ रक्कम देखील भरावी लागणार आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि ओळखपत्र लिलावाच्या वेळी घेऊन यावे. त्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही.
लिलावासंबंधित अटी व नियमांची माहिती लिलावाच्या वेळेला देण्यात येईल. निविदा रक्कम बाबत बोर्ड समाधानकारक न वाटल्यास आणि अन्य कारणामुळे परत गाळ्यांचा लिलाव केला जाऊ शकतो. न्यू पोल्ट्री मार्केट बिल्डिंगमधील चिकन गाळ्यांसाठी प्रतिमहिना 4300 रुपये रक्कम मूळ किंमत दिली आहे.
तसेच व्हेजिटेबल मार्केट 1 ते 8 गाड्यांसाठी प्रतिमाह प्रत्येक गाळ्यासाठी 350 रुपये मूळ किंमत, फिश मार्केटमधील 2 ते 7, 9, 12 ते 16, 18 व 19 गाळे प्रतिमहिना 1600 रुपये मूळ किंमत, फिश मार्केट आऊटर स्टॉल 20 ते 25 गाळे जनरल शॉपसाठी प्रतिमहिना 1600 रुपये मूळ किंमत आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.