Thursday, January 30, 2025

/

त्या’ आदेशासंदर्भात संरक्षण मंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय

 belgaum

बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील कांही खासगी शैक्षणिक संस्थांना जागा रिकामी करा, असा आदेश काढण्यात आल्याने समस्या निर्माण झाली असून डिफेन्स स्टेट ऑफिसरशी संबंधित असलेला हा मुद्दा निकालात काढण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना निवेदन धाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील युनियन जिमखान्यासह इतर आस्थापने असलेल्या संघ, संस्था आणि शाळांना जागा रिकामी करा, असा केंद्र सरकारचा आदेश आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या आदेशाविरुद्ध अनेक जण न्यायालयात गेले आहेत. यासंदर्भात आज कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध खासगी शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.Camp meeting

 belgaum

यावेळी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून आलेल्या आदेशा पत्राबाबत सर्वांगाने चर्चा करण्यात आली. चर्चेअंती हा मुद्दा डिफेन्स स्टेट ऑफिसरशी संबंधित असल्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना निवेदन धाडून निर्माण झालेली समस्या दूर करण्याची विनंती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीस फादर नेल्सन, पिंटो, सिस्टर मेरी, फादर सॅबी डिसोजा, लुईस रॉड्रिक्स आदींसह कॅन्टोन्मेंट हद्दीतील विविध शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.