Wednesday, December 25, 2024

/

बेकायदेशीर दारूसह 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त : एकाला अटक

 belgaum

बेळगाव शहरातील कॅम्प पोलिसांनी धाड टाकून सुमारे 50 हजार रुपये किंमतीच्या बेकायदेशीर दारूसह एक कारगाडी असा अंदाजे 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

अनिल नारायण धामणे (रा. ढोर गल्ली, बेळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. अनिल हा कार गाडीतून गोव्यातून बेळगावला दारूची बेकायदा वाहतूक करत होता.

त्यावेळी गणेशपुर रोडवर कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमट्टी यांनी त्याला पकडले. तसेच सुझुकी बोलेनो कार गाडीसह गाडीतील विविध ब्रँडच्या 750 एमएल दारूच्या एकूण 182 बाटल्या जप्त केल्या. या दारूची बाजारातील किंमत सुमारे 50 हजार रुपये होते.

तर कारगाडीची किंमत अंदाजे 8 लाख रुपये होते. या प्रकरणी कॅम्प पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलिसांना उपरोक्त कारवाईबद्दल शाब्बासकीसह बक्षीस देऊ केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.