Tuesday, December 24, 2024

/

‘या’ स्टुडिओची झालीय हैदराबादच्या ‘फॅशन शो’साठी निवड

 belgaum

बेळगावातील प्रसिद्ध डिझायनर्स भाग्यश्री पाटील आणि अवंती पाटील यांच्या बेलीफ डिझाईन स्टुडिओची हैदराबाद येथे तेलंगणा सरकारच्या हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या फॅशन शोसाठी निवड झाली आहे.

बेळगाव शहरात 2008 साली स्थापन झालेल्या बेलीफ डिझाईन स्टुडिओद्वारे सानुकूलित विस्तृत प्रकारचे पोशाख तयार केले जातात. जे व्यक्तिला शोभून दिसणारे उठावदार असतात. फॅशनची आवड असणाऱ्या भाग्यश्री पाटील आणि अवंती पाटील या उभयता पोशाख तयार करताना त्यामध्ये पारंपारिक हस्तकला तंत्राचा वापर करत असल्यामुळे त्यांनी तयार केलेले पोशाख अव्दितीय असतात, शिवाय हे पोशाख समकालीन, डोळ्यात भरणारे आणि परवडणारे असतात हे विशेष होय.

पोशाख खरेदी प्रसंगी प्रत्येक वेळी सकारात्मक अनुभव आला पाहिजे यासाठी भाग्यश्री व अवंती प्रयत्नशील असतात हॅन्ड एम्ब्रॉयडरी केलेले कुर्ते, ब्लाऊज, सेमीस्टीच फॅब्रिक्स आणि पोशाखाची समकालीनता ही बेलिफ डिझाइन स्टुडिओची खासियत आहे.Belief design

आता या स्टुडिओची हैदराबाद येथे तेलंगणा सरकारच्या हातमाग आणि वस्त्रोद्योग खात्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या फॅशन शो साठी निवड झाली आहे. तेथील विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे तेलंगणा येथील विणकरांनी तयार केलेल्या कपड्यापासून देशातील विविध ठिकाणचे डिझायनर्सनी सर्जनशीलता दाखवून तयार केलेले पोशाख सर्वांसमोर प्रदर्शित करणे हादेखील या फॅशन शो आयोजना मागील उद्देश आहे. सदर फॅशन शो साठी निवड झाल्याबद्दल भाग्यश्री आणि अवंती पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.