Sunday, November 17, 2024

/

…अन् असहाय्य गरीब कुटुंबाच्या हाकेला धावली शिवसेना!

 belgaum

लाॅक डाऊनमुळे हत्तरगीनजीक एका खेडेगावात गेल्या तीन महिन्यापासून असहाय्य व्यवस्थित अडकून पडलेल्या हलाखीच्या अवस्थेतील एका कुटुंबाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या गावी सुखरूप पोचवून दिलासा दिल्याची घटना आज शुक्रवारी घडली. गावी घरी पोहोचवण्याबरोबरच त्यांना कांही रोख रकमेसह दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्यही देण्यात आले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुंडी येथील मारुती विष्णू सुतार लक्ष्मी मारुती सुतार आणि त्यांची प्रथमेश, प्रणव व प्रांजल ही सुमारे 12 वर्षाआतील लहान मुले, असे पाच जणांचे गरीब कुटुंब तीन महिन्यापूर्वी लग्नानिमित्त हत्तरगी नजीकच्या बेनोळी या खेडेगावात गेले होते. मात्र त्याचवेळी लॉक डाऊन जारी झाला. त्यामुळे सदर कुटुंब बेनोळी गावातच अडकून पडले. तीन महिन्यात परतीच्या प्रवास खर्चासाठी ठेवलेले पदरचे पैसे देखील संपले. त्यामुळे माघारी सुंडीला आपल्या गावी परत कसे जायचे? असा प्रश्न मारुती सुतार याला पडला होता.

मुळात आपली हलाखीची परिस्थिती आणि लग्नानिमित्त ज्या पाहुण्यांच्या घरी आपण राहत आहोत त्याची परिस्थिती देखील बेताची असल्यामुळे मारूती याने गावी परत जाण्यासाठी लोकांकडे मदतीची याचना केली. मात्र कोणीच मदतीसाठी पुढे येत नसल्यामुळे आपले व आपल्या कुटुंबाचे पुढे काय होणार? या चिंतेने मारुती हताश झाला होता. त्याला आपल्या कुटुंबाची परवड पहावत नव्हती.Sena

दरम्यान, अलीकडेच याबाबतची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांना मिळाली. तेंव्हा त्यांनी लागलीच बऱ्याच प्रयत्नानंतर बेनाळी येथे अडकून पडलेल्या मारुती सुतार यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली आणि त्याला मदतीचे आश्वासन दिले. त्यानुसार बंडू केरवाडकर यांनी आपले सहकारी शिवसेनेचे बेळगाव उपशहर प्रमुख राजू तुडयेकर आणि प्रवीण तेजम यांच्या मदतीने आज शुक्रवारी मारुती व त्याच्या कुटुंबाला सुखरूप सुंडी येथील त्यांच्या घरी पोहोचविले. त्याचप्रमाणे त्यांना दोन महिने पुरेल इतकी जीवनावश्यक साहित्य आणि भाजीपाला देऊ केला.

शिवाय मारुतीला रोजगार मिळेपर्यंत कुटुंबाच्या वर खर्चासाठी 4 हजार रुपये देखील दिले. यापद्धतीने बंडू केरवाडकर यांच्या स्वरूपात शिवसेना आपल्या मदतीला देवासारखी धावून आल्याबद्दल सुतार कुटुंबीयांनी केरवाडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे शतशः आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.