Friday, November 15, 2024

/

भरधाव ट्रक -टेम्पो अपघात

 belgaum

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळू -विटा भरलेल्या वाहनांमुळे येळ्ळूर रोड हा रस्ता दिवसेंदिवस जिवघेणा बनत चालला असून आज सकाळी या रस्त्यावर भरधाव ट्रक आणि टेम्पो यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर इजा अथवा जीवित हानी झाली नाही.

येळ्ळूर रोड मार्गे दररोज खानापूर तालूक्यातून वाळू, विटाच्या गाड्या भरधाव ये -जा करत असतात. शेताकडे जाणारे शेतकरी आणि महिलांना या गाड्यांचा वेग पाहून जीव मुठीत धरून जावे लागते.

अशा परिस्थितीत आज रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास येळ्ळूरकडून वडगावकडे जाणारी भरलेली भरधाव ट्रक तसेच वडगावकडून येळ्ळूरमार्गे रिकामा जाणारा भरधाव टेंम्पो यांची येळ्ळूर सीमेजवळ जोरदार धडक झाली. त्यामुळे मोठा आवाज होत टेंम्पो चालकाचा ताबा सुटून टेंम्पो बाजूच्या भाताच्या शेतात उलटून पडला.

त्यात सुदैवाने ड्रायवरला कांही झाले नाही किंवा योगायोगाने ज्या शेतात टेंम्पो उलटला तिथे शेतकरी काम करत नसल्यामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही.Accident

अपघाताच्या आवाजाने आजूबाजूचे शेतात गेलेले शेतकरी तसेच कामावर जाणारे नागरिक अपघात स्थळी जमा झाले होते. सदर मार्गावरील वाळू विटांच्या भरधाव वाहतुकीमुळे येळ्ळूरचे अनेक शेतकरी आपला रोष प्रकट करत आहेत. आता शेतात भांगलनीचा व भात लावणीचा जोर असल्यामुळे मोठ्या संख्येने महिला येत असतात.

तेंव्हा येळ्ळूर रोडवरील वाळूविटाची वाहतूक करणाऱ्या ट्रक व टेंम्पोवर बंदी घालावी. या ट्रक टेम्पोना खानापूर रोडवरुन जाण्यासाठी येळ्ळूर ग्रामपंचायतीने संबधीत खात्याला निवेदन देत आंदोलनाचा इशारा द्यावा, अशी मागणी शेतकरी, शेतकरी महिला व या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.