बेळगाव शहरांत स्मार्ट सिटीच्या कामांच्या नावाने तुघलकी कारभार सुरू असून स्मार्ट सिटीच्या कामांमुळे अनेक बळी गेले आहेत.
मागील वर्षी मंडोळी रोड वर स्मार्ट सिटीच्या दुर्लक्षितपणामुळे पोटात लोखंडी बार घुसून एकाचा मृत्यू झाला होता त्याच अपघाताची पुनरावृत्ती होत शनिवारी रात्री स्मार्ट सिटीच्या कामाने आणखी एकाचा बळी घेतलाआहे.
नियंत्रण चुकून दुभाजक तयार करायला लावलेल्या लोखंडी बार मध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8 च्या दरम्यान घडली आहे.बेळगाव सेंट्रल बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा जवळील दुभाजका जवळ ही घटना घडली आहे.
मोहम्मद दस्तगीर मुल्ला वय 69 रा. न्यु गांधीनगर बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.बस स्थानक रोड वरील दुभाजक बनवण्यासाठी घालण्यात आलेल्या लोखंडी सळीवर पडल्याने ही घडली आहे.
बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यावर दुभाजक बनवण्यासाठी बार बिल्डींग करण्यात आली आहे.काही ठिकाणी बार घालून काँक्रेट घालण्यात आले आहेत तर काही ठिकाणी बार खुले सोडण्यात आले होते.याला ठेकेदार जबाबदार आहेत अश्या ठेकेदाराना कोण लगाम घालणार असा प्रश्न उपस्थित होते.
रविवारी पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगावला भेट देणार असून स्मार्ट सिटी कामांची भेट देणार आहेत त्यावेळी यांनी अश्या समस्या सोडवावी अशी मागणी होत