गेले दोन दिवस जलाशय परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील कर्नाटक हद्दीत असणार्या पाचही जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून या सर्व जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अलमट्टी जलाशयातून सर्वाधिक 170000.00 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग होत आहे.
कृष्णा खोऱ्याच्या कर्नाटक व्याप्तीत येणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा व पाणी पातळीचा आज शुक्रवारी 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नोंद झालेला तपशील पुढील प्रमाणे आहे. हिडकल जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 51.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 38.42 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 637.93 मीटर, सध्याचा इनफ्लो 53592.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 129.00 क्युसेस. मार्कंडेय जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 3.69 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 3.22 टीएमसी, सध्याचा इनफ्लो 6238.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 4744.00 क्युसेस.
अलमट्टी जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 123.00 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 91.93 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 517.58 मीटर, सध्याचा इनफ्लो 196389.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 170000.00 क्युसेस. नारायणपूर जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 33.31 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 27.68 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 490.96 मीटर, सध्याचा इनफ्लो 117898.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 160000.00 क्युसेस. मलाप्रभा जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 37.73 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 24.83 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 630.78 मीटर, सध्याचा इनफ्लो 33677.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 194.00 क्युसेस.
कृष्णा खोऱ्याच्या महाराष्ट्र व्याप्तीत येणाऱ्या जलाशयातील पाणीसाठा व पाणी पातळीचा तपशील पुढील प्रमाणे आहे. कोयना जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 105.25 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 82.98 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 653.64 मीटर, सध्याचा इनफ्लो सरासरी 267529.00 क्युसेस, सध्याचा आउटफ्लो 11667.00 क्युसेस. वारणा जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 34.40 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 32.73 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 625.55 मीटर, सध्याचा आउटफ्लो 25230.00 क्युसेस.
दूधगंगा जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 25.40 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 17.55 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 639.00 मीटर, सध्याचा आउटफ्लो 100.00 क्युसेस. राधानगरी जलाशय : एकूण पाणीसाठा क्षमता 8.36 टीएमसी, सध्याचा पाणीसाठा 7.22 टीएमसी, सध्याची पाणी पातळी 589.09 मीटर, सध्याचा आउटफ्लो 1400.00 क्युसेस.