बेळगाव जिल्ह्यात जवळपास 600 सक्रिय कोविड रुग्ण आहेत महाराष्ट्र सीमा जवळ आहे या शिवाय चिकोडी भागांत रुग्णांची संख्या वाढत आहे.संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने टास्क फोर्स समितीच्या अध्यक्ष आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनी केलेल्या सूचनेनुसार बेळगाव जिल्ह्यातील गणेश उत्सवासाठी नियमावली जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी एका आदेशानुसार नियमावली जाहीर केल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील देवस्थान आणि गणेश उत्सवासाठी मनपा, पोलीस स्थानक,हेस्कॉम,अग्निशामक दल आरोग्य खाते आणि प्रदूषण नियंत्रण महा मंडळाकडून परवानगी मिळवणे गरजेचे आहे.
कोविड नियमांचे पालन करून डॉल्बी फटाकडे आणि रंगांचा वापर न करता वरील शासकीय विभागाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करत कंटेमेंट झोन बाहेरील मंदिरात मध्ये साजरा करावा.
पी ओ पी वापरून बनवलेल्या गणेश मूर्तीवर बंदी घालण्यात आली असून केवळ शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. घरघुती मूर्तींची उंची 2 फूट तर देवस्थानात सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फूट उंचीच्या असाव्यात.
घरात स्थापन केलेल्या मूर्ती घराच्या आवारात विसर्जनाची व्यवस्था करावी जर तशी सोय न झाल्यास मनपा प्रदूषण महा मंडळाने तयार केलेल्या मोबाईल टँकर मध्येच विसर्जित करावे.
देवस्थान मध्ये पूजल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी गर्दी होईल अशी जाहिराती करू नयेत.कोविड नियंत्रण आणि आरोग्य संदेश देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.
सांस्कृतिक,मनोरंजन धार्मिक भजन किर्तन ऐवजी कोविड नियंत्रण जनजागृती करावी, कोरोना मलेरिया डेंग्यू जनजागृती करावी,सार्वजनिक स्वच्छते बाबत जनजागृती करावी,शासकीय नियमानुसार ध्वनिक्षेपक वापर करावा.
गणेश उत्सवाच्या आरती साठी केवळ पाचच जणांची उपस्थिती असावी
श्री गणेश दर्शनची सोय ऑनलाईन करावी,केबल टी व्ही,वेबसाईट सोशल मीडियाच्या माध्यमातून करावी.
गणेश प्रतिष्ठापना झालेल्या ठिकाणी दररोज सॅनीटायझेशन करावे, या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग व्यवस्था असावी,दर्शनासाठी येणाऱ्या भक्तात सहा फुटांचा अंतर असावा सोशल डिस्टन्स पाळला जावा.प्रत्येकाने मास्क घातले पाहिजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लसीकरण करून घेणे गरजेचे.
गणेश विसर्जन असोत किंवा प्रतिष्ठापना असोत कोणत्याही प्रकाराची मिरवणूक काढता कामा नये.गणेश विसर्जन करायच्या ठिकाणी जास्त वेळ थांबू नये.लहान मुलं,गरोदर महिला,वृद्ध आणि आजारी असलेल्यानी विसर्जन किंवा प्रतिष्ठापना ठिकाणी जाऊ नये.एकाच वेळी विसर्जनासाठी न जाता पोलीस खात्याने दिलेल्या वेळेत विसर्जन करावे.
पोलीस खात्याने दिलेल्या मार्गाचा वापर गणेश विसर्जननासाठी करावा ,मनपा किंवा शासनाने दिलेल्या तलावात किंवा मोबाईल टँकर मध्येच गणेश विसर्जन करावे.
कोविड 19 नियंत्रणासाठी आरोग्य खाते,मनपा पोलीस प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
एकूणच मंडपाऐवजी जवळच्या मंदिरात सार्वजनिक गणेश प्रतिस्थापना करा असे या नियमावलीत म्हटले आहे त्यामुळे बेळगावात याबाबत गणेश महामंडळ कोणता निर्णय घेणार याकडेही लक्ष लागले आहे.