अश्लील सी डी प्रकरणी राजीनामा दिलेले तत्कालीन जलसंपदा मंत्री व गोकाकचे विध्यमान आमदार रमेश जारकीहोळी आमदार पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जारकीहोळी यांनी कर्नाटकातील जे डी एस काँग्रेसचे सरकार पाडत भाजपचे सरकार आणण्यात महत्वाची भूमिका निभावली होती त्या नंतर अश्लील सी डी प्रकरणी त्यांनी राजिनामा दिला होता.
रमेश जारकीहोळी यांनी सोबतीला काही आमदार घेत मुंबईला गेल्याचे वृत्त कन्नड वहिनीने दिले असून ते बुधवार 23 रोजी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं देखील म्हटल आहे.
मुंबईहुन थेट बंगळुरूला येत ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असे देखील जारकीहोळी यांच्या नातलगांने कन्नड वहिनीला सांगितलं असल्याचं वृत्तवाहिनीने म्हटलं आहे.
भाजप हाय कमांडने सी डी प्रकरणा नंतर पाच महिने उलटले तरी यातून बाहेर काढण्यास रुची दाखवली नाही उगीचंच प्रकरणाला वेगवेगळे वळण दिले जात आहे त्यासाठी रमेश जारकीहोळी नाराज असल्याचे बोलले जात आहे.
आम्ही आणलेल आमचं सरकार आम्हाला पाठिंबा देत नाही मंत्री पदाचा राजीनामा देतेवेळी पुन्हा मंत्री करू असे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पाळण्यास विलंब होत आहे त्यामुळे ते नाराज आहेत अशीही चर्चा आहे.
जलसंपदा खात्याच्या मंत्री एच विश्वनाथ यांच्या सोबत 20 हजार कोटींचा टेंडर बाबत देखील ते नाराज आहेत आणि मुंबईला आमदार महेश कुमटहळळी आणि के एम एफ चे भालचंद्र जारकीहोळी देखील त्यांच्या सोबत मुंबईला गेल्याची शक्यता आहे.