Monday, May 6, 2024

/

गोजगा -उचगाव संपर्क रस्ता गेला वाहून!

 belgaum

गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोजगा -उचगाव संपर्क रस्त्यावरील गोजगा गावाच्या शेजारी असलेल्या नाल्याजवळील रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

पावसामुळे गोजगा -उजगाव संपर्क रस्त्यावरील गोजगा गावाशेजारील नाल्या जवळचा रस्ता वाहून गेल्यामुळे या ठिकाणच्या चिखलाच्या दलदलीतून ये -जा करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

दोन महिन्यापूर्वी गोजगा -उचगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. मात्र गावाशेजारी असलेल्या नाल्याजवळ पूल वजा बंधारा बांधणे ऐवजी केवळ पाईप घालण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे. जोरदार पावसामुळे शिवारातून आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला आहे.Uchgav gojaa

 belgaum

पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेल्यामुळे त्याच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे. या रस्त्याच्या ठिकाणी पूलवजा बंधारा बांधावा अशी अनेक महिन्यांपासून मागणी केली जात असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सध्या हा संपर्क रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदर वाहून गेलेल्या रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.