दोन महिला लोकप्रतिनिधीचा मतदारसंघ आजूबाजूला लागून मात्र रस्ता कोणत्या मतदारसंघात येतो याची सीमा नक्की नसल्याने दोघानीही या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.उर्वरित दोन्ही कडच्या रस्त्याचे काम पूर्ण झालंय सीमेवरचा रस्ता दुर्लक्षित असल्याने हत्ती गेला अन शेपूट उरले अशी भावना या भागांतील जनतेतून व्यक्त होत आहे.
खानापूर ते गर्लगुंजी राजहंस गड येळळुर बेळगाव कडे व देसुरकडे जाणारा रस्ता आर्धा खानापूर तालुक्याच्या हद्दीत येतो तर आर्धा रस्ता बेळगाव ग्रामीणच्या हद्दी मध्ये येत असलेला हा रस्ता खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर व बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेबाळकर यांनी शासनाकडून निधी मंजूर करून रस्ता उत्तमरीत्या केलेला आहे पण हद्दीच्या वादातून गर्लगुंजी गावच्या व राजहंस गड गावच्यामध्ये साधारण अर्धा की मीटर रस्ता बेळगाव ग्रामीण हद्दीत येतो की खानापूर तालुक्याच्या हद्दीत येतो हे कळत नसल्याने हा रस्ता तसाच सोडण्यात आला आहे .
या रस्त्यावर अनेक खड्डे पडले असुन अपघात होत आहेत या ठिकाणी क्वालिटी कंपनीची अंड्यांची कंपनी असुन आजुबाजूच्या महिला त्याठिकाणी रोजंदारी करायला जात असतात व वर्दळही वाढलेली आहे त्यामुळे येथुन ये जा करणाऱ्यात असमाधान व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यात खड्ड्यात दुचाकी घसरून दुचाकीवरून दोन महिला पडल्याने त्यांना दुखापतसुध्दा झाली होती पण सीमेच्या वादावर बेळगाव ग्रामीणच्या आमदार व खानापूरच्या आमदारांनी एकदासर चर्चा करून त्यावर तोडगा काढून या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी या भागातील जनतेतून व्यक्त होत आहे
सदर दोन्ही आमदार काँग्रेस पक्षाशी संबंधित असुन बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या बेळगाव ग्रामीण मधुन जरी निवडून आल्या असल्या तरी त्या मुळच्या खानापूर तालुक्यातील आहेत त्यामूळे त्यांनी जातीने यात लक्ष घालून सदर आर्धा की मीटरचा रस्ता पुर्ण करावा अशी जनतेतून मागणी होत आहे