श्री राम सेना हिंदुस्थान गणाचारी गल्ली बेळगाव संचलित श्री स्वामी विवेकानंद मोफत दवाखाना गेले एक वर्ष गोर गरीब जनतेच्या सेवेत हजर आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला या दवाखान्याने वर्षभरात 1200 हुन अधिक सामान्य आजार असलेल्या गरीब रुग्णांना वरती मोफत उपचार केले आहेत.
या शिवाय जे रुग्ण कोरोनाच्या पहिल्या स्टेज मध्ये आहेत व ज्यांना हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही अशा तब्बल 22 गरीब कुटुंबातील कोरोना रुग्णांना मोफत उपचार करण्यात आले आहेतते सर्व रुग्ण बरे सुध्दा झाले आहेत.
श्री स्वामी विवेकानंद क्लिनिक मध्ये बेळगाव मधील युवा व नामांकित असे हे खालील 6 डॉक्टर कार्यरत आहेत.Dr राधिका N,Dr श्रद्धा पाटील,Dr मल्लिकार्जुन अवंती,Dr अखिल देवीकरीमत्ती,Dr रोहन पाटील,Dr विनायक गुडशी कार्यरत आहेत.
या क्लिनिक साठी लागणारी सर्व औषधे व डॉक्टर्ससाठी लागणारा निधी बेळगावचा सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील हा स्वखर्चाने देत असतात.
इतकेच काय तर हा दवाखाना सुरू करण्यासाठी शंकर यांनी आपलेच घर वापरण्यासाठी दिले आहे.बरे झालेले हजारो गरीब रुग्ण आनंदाने शंकर पाटील या सामाजिक कार्यकर्त्यांचे आशीर्वाद देवून आभार मानत असतात. अश्या या माणसातील देवमाणसाच्या प्रामाणिक कार्याला एक सॅल्युट