सुळगे(येळ्ळूर) क्रॉस येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बसवलेला दिशादर्शक फलकाची नासधूस अज्ञातांनी केल्याचा संतापजनक प्रकार देसुर जवळील राजहंसगड क्रॉस येथे घडला आहे.
रविवारी सकाळी सदर फलक पाडल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देऊन या ठिकाणी दिशा दर्शक फलक बसवावा अशी मागणी केली जात आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी देसुर येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित पोटे आदी युवकांनी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या सहकार्याने सुळगा क्रॉसवर दिशा दर्शक फलक बसवला होता त्यावर मराठी भाषेत दिशा दर्शक व गावांची नावे लिहिली होती.
देसुर येथील युवकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदने दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते अखेर जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्त्यानी जनतेच्या मदतीसाठी हा दिशा दर्शक फलक उभा केला होता तो फलक काढून त्याला रंग लावत नासधूस केली आहे.
राजहंसगडा कडून डेसुरकडे किंवा येळ्ळूर मार्गे बेळगावकडे जाण्यासाठी ये जा करणाऱ्याना या दिशा दर्शक फलकाची मदत होत होती या अगोदर अनेक रस्ता चुकत होते त्यांना फेरफटका मारावा लागत होता त्यातच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अनेकदा मागणी करून फलक उभारला नसल्याने युवकांनी स्व खर्चातून हा फलक उभारला होता.
दिशादर्शक फलक मराठीत असल्याने मराठी द्वेष्ट्यानी काढला असेल असा आरोप करून या प्रकरणी शासनाने लक्ष घालत फलक उभा करावा अशी केली जात आहे.