Sunday, November 17, 2024

/

*…अन् त्या वृद्धाला सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मदतीचा हात*

 belgaum

चक्कर येऊन असहाय्य अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या पडलेल्या एका वृद्ध इसमाला माजी नगरसेवकासह युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देऊन त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था केल्याची घटना आज दुपारी हेमू कलानी चौक येथे घडली.

शहरातील पाटील मळ्या नजीकच्या हेमु कलानी चौकामध्ये आज दुपारी 3 -3:30 च्या सुमारास एक वृद्ध इसम चक्कर येऊन रस्त्यावर पडला होता. रस्त्यावर असहाय्य अवस्थेत पडलेला सदर वृद्ध इसम निदर्शनास येताच माजी नगरसेवक नारायण किटवाडकर आणि एकता युवक मंडळ कांगली गल्लीच्या कार्यकर्त्यांनी त्याला शुद्धीवर आणून चौकशी केली.

त्यावेळी संबंधित वृद्धाला बोलता येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्या खिशातील कागदपत्रे तपासली. तेंव्हा त्यातील आधार कार्डाच्या प्रतीवरून तो इसम महादेवनगर जुने बेळगाव येथील रहिवासी असल्याचे आणि त्याचे नांव उद्दाप्पा बाबू चोपडी (वय 81) असे असल्याचे स्पष्ट झाले.Social work

सदर वृद्धाला उपचाराची गरज असल्याने उपस्थितांनी हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावेळी सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या ॲम्बुलन्ससह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तसेच त्या वृद्धाला ॲम्बुलन्समधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. सदर मदतीबद्दल माजी नगरसेवक नारायण किटवाडकर यांनी अनगोळकर यांचे आभार मानून त्यांच्या समाजसेवेची प्रशंसा केली.यावेळी बाळकृष्ण तोपीनकट्टी, सह एकता युवक मंडळाचे देखील कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.