लेंडी नाल्याच्या ब्रिज खालील पाईपमध्ये पळून जाऊन बसलेल्या त्या मतिमंद मुलाला सुरक्षित बाहेर काढत आधार देण्याचे काम बेळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे.
जुना पी बी रोड येथे गेल्या काही दिवसांपासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईप मध्ये रहात होता याची माहिती हेल्प फॉर नीडी ऑटो ॲम्बुलन्सचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ माधुरी जाधव पाटील यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते
त्यावेळी त्याची विचारपूस करण्यासाठी माधुरी जाधव मतिमंद मुलाकडे गेल्या असताना सदर मुलाने चौकशी सुरू असताना अचानक पळ काढत चक्क तो लेंडी नाल्यात उतरून पाईप मध्ये जाऊन बसला.
त्यावेळी गौतम कांबळे अत्यंत धाडसाने नाल्यात उतरून आणण्याचा प्रयत्न केला मात्र सुरुवातीला त्यांना अपयश आले अखेर दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्या मुलाला पाइपमधून बाहेर काढण्यात यश आले.
पाईप मधून बाहेर काढताच घाबरलेल्या मुलाला सुरेंद्र अनगोळकर व अनिल अष्टेकर यांनी खायला देऊन पाण्याची व कपड्यांची व्यवस्था केली. त्या मुलाची खासबाग येथील महानगर पालिका निराधार आश्रय केंद्र येथे त्याची राहण्याची व्यवस्था केली.
श्रीरामसेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते निलेश पाटील भरत नागरोळी राजेंद्र बैलूर मुकेश राजपुरोहित सौरभ कुंदप यावेळी उपस्थित होते.