सुरुवातीला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात जनतेतून म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता मात्र कोविडची दुसरी लाट ओसरत असताना आणि तिसऱ्या लाटेची भीती असताना लस घेण्यासाठी नागरिकांत जनजागृती निर्माण झाली आहे बेळगाव शहर बिम्स इस्पितळ असो किंवा ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असोत लसीकरण केंद्रावर गर्दीची दृश्ये पहायला मिळत आहेत.
गेले दोन दिवस बेळगाव शहरात लसींचा तुटवडा भासत असल्याने वॅक्सिंन घेण्यासाठी गेलेल्या अनेकांना माघारी परतावे लागत आहे.बिम्सने एक लाख लसींची मागणी केली होती मात्र शासनाकडून केवळ 8 हजार लसी आल्या आहेत त्यामुळे प्रथम लस घेणाऱ्यांना देणार नसून केवळ 45 वर्षा वरील लोकांना पहिला आणि दुसरा डोस देत आहोत बिम्स अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे रांग लावलेल्या अनेकांना नाराज होऊन परत फिरावे लागले.
रविवारी पासून बेळगाव जिल्ह्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन व्यवस्थित लस पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.
एकीकडे सरकार लसीकरण करण्यासाठी आग्रही असते तर दुसरीकडे बेळगावात अनेक केंद्रावर लस उपलब्ध नाही त्यामुळे जनतेत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
बेळगाव तालुक्यात लसीकरणात गैरकारभार व राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गावोगावी आणि गल्लोगल्ली राजकीय नेत्यांच्या नावानिशी फॉर्म वाटून आणि विशिष्ट पक्षाच्या मर्जीतील लोकांनाच सदर फॉर्म असेल तर फ्रंट लाईन कोरोना वारीयर निकषाखाली लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जात आहे. आणि जे सामान्य नागरिक खरोखर फ्रंट लाईन कोरोना वारीयर निकषात मोडतात ते या लसीकरणातून वंचित रहात आहेत असा आरोप देखील होत आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी देखील मागणी वाढू लागली आहे.