Sunday, April 28, 2024

/

गर्भवती गाईला जीवदान*

 belgaum

गुजरात हुन ट्रक मधून चेन्नई कडे घेऊन जाणाऱ्या एक गर्भवती गायीवर उपचार करत गायीला जीवदान देण्याचे काम माझा धर्म पशु बचाव दलाने केलं आहे.

गुजरात मधील श्री रामानुजार ऐयरपडी गोशाळा येथून 19 जून 2021 रोजी आठ गाई घेऊन चेन्नईला जात होते. जवळपास कराड सातारा जवळ एक गाय अशक्त झाली असे गाडी चालकाला लक्षात आले.

तर ती गाडी आपल्या बेळगाव जवळील सुत्तगट्टी येथील राम धाब्याजवळ ती गाडीतच बेशुद्ध पडली त्यानंतर त्या ड्रायव्हर ने स्थानिक लोकांना मदतीची हाक दिली.Cow

 belgaum

यानंतर स्थानिक लोकांनी राजू टक्केकर यांना संपर्क साधला. त्यांनी लगेच हा माझा धर्म पशू बचाव दल चे विनायक केसरकर यांना रेस्क्यू कॉल केला. विनायक केसरकर काकती येथील पशू चिकित्सालयात उपचारासाठी आणले.वैद्य चंद्रू यांनी त्या गाईवर उपचार केले आणि पूनश्च पिढीत गाईसोबत बकीच्याही गाई चेन्नईला रवाना झाल्या .

विनायक केसरकर यांनी त्या चालका सोबत असलेल्या परवानगी पत्र व इतर कागद पत्रकांची तपासणी करून त्या गाईंना त्यांच्या पुढच्या प्रवासाला चालना दिली.अशाप्रकारे बेळगावकर संघटनेने एका गर्भवती गाईला जीवदान देण्यात यश मिळवले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.