बेेेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी उद्या शनिवार दि. 12 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सोमवार दि. 14 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरासह जिल्ह्यात संपूर्ण लॉक डाऊन घोषित केला आहे.
सदर लॉकडाउनच्या काळात शनिवार व रविवारी सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत भाजीपाला खरेदी करण्यासाठी देखील मुभा नसणार आहे. तथापि दूध विक्री, ऑनलाइन अन्नपदार्थ मागविणे, औषध दुकाने, तातडीची रुग्णसेवा, रीतसर परवानगी घेतलेले नियोजित विवाह समारंभ, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य मालवाहतूक या सेवांना परवानगी असणार आहे.
रेशन दुकाने आणि कृषी सेवा केंद्रे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत खुले राहतील, तर रयत केंद्रे दुपारी 12 वाजता पर्यंत खुली राहणार आहेत. तेंव्हा शेतकऱ्यांना पीडीओंच्या परवानगीने सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत रयत केंद्रामध्ये बियाणे आणि खताची खरेदी करता येईल.
सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या कामावर रुजू होण्यास अनुमती असेल. भादवि कलम 144 अन्वये नागरिकांच्या अनावश्यक संचारावर बंदी असणार आहे.
जे कोणी लाॅक डाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर भादवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंदवून खटला दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.