गोवा राज्यातून चोर्ला मार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडे आरटी-पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असणे बंधनकारक असून कणकुंबी चेकपोस्ट येथे त्याची तपासणी सुरू झाली आहे.
गोव्यातून कर्नाटक हद्दीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडून आरटी-पीसीआर प्रमाणपत्रांची तपासणी कणकुंबी येथे करण्यात येत असली तरी कणकुंबी चेक पोस्टला या तपासणीचा अधिकृत आदेश मिळालेला नाही.
तथापि खबरदारी म्हणून ही तपासणी केली जात असल्याचे समजते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला त्यावेळी जारी करण्यात आलेल्या प्रवासाच्या एसओपी मध्ये महाराष्ट्र, केरळ आणि दिल्ली येथून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली.
मात्र या यादीत गोव्याचे नांव नव्हते. आता गेल्या 28 जून रोजी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी कोणत्याही स्पष्ट आदेशाविना कणकुंबी चेकपोस्ट येथे केली जात आहे.