बेळगाव जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार दि. 18 जून 2021 पर्यंत पडलेल्या पावसापैकी खानापुर पर्जन्यमापन केंद्रात सर्वाधिक 353.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असली तरी सर्वसामान्य सरासरीपेक्षा ती वजा 5.90 टक्के कमी आहे. सौंदत्ती येथे मात्र सरासरीपेक्षा तब्बल 157.93 टक्के जादा पाऊस कोसळला आहे.
बेळगाव सरकारी विश्रामधाम येथील पर्जन्यमापन केंद्रामध्ये जूनमध्ये 240 मि. मी. इतक्या सर्वसामान्य पावसाची नोंद होते. मात्र यंदा आज 18 जुनपर्यंत या ठिकाणी 276.8 मि. मी. पाऊस नोंदविला गेला असून जो सर्वसामान्य सरासरीपेक्षा 13.25 टक्के जास्त आहे. खानापुर पर्जन्यमापन केंद्रांमध्ये 376 मि.मी. ऐवजी 353.8 मि.मी. इतका कमी पाऊस नोंदविला गेला आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्रात आज 18 जून 2021 पर्यंत नोंदविला गेलेला पाऊस (अनुक्रमे तालुका केंद्र, जूनमधील सर्वसामान्य पाऊस, 18 जूनपर्यंत नोंदविला गेलेला पाऊस आणि टक्केवारी या पद्धतीने) खालील प्रमाणे आहे.
अथणी : 78 मि.मी., 131.4 मि.मी., 68.46 टक्के. बैलहोंगल : 89 मि.मी., 177.5 मि.मी., 99.44 टक्के. बेळगाव आयबी : 240 मि.मी., 271.8 मि.मी., 13.25 टक्के. चिक्कोडी : 86 मि.मी., 0 मि.मी., -100 टक्के. गोकाक : 69 मि.मी., 0 मि.मी., -100 टक्के. हुक्केरी : 102 मि.मी., 243.5 मि.मी., 138.73 टक्के. खानापूर : 376 मि.मी., 353.8 मि.मी., -5.90 टक्के. कित्तूर : 201.2 मि.मी., 197.3 मि.मी., -1.94 टक्के. मुडलगी : 79.1 मि.मी., 143 मि.मी., 80.78 टक्के. निप्पाणी : 159.5 मि.मी., 311 मि.मी., 94.98 टक्के. रायबाग : 72 मि.मी., 100 मि.मी., 38.89 टक्के. रामदूर्ग : 68 मि.मी., 140 मि.मी., 105.88 टक्के. सौंदत्ती : 87 मि.मी., 224.4 मि.मी., 157.93 टक्के.